नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जी -२० परिषदेंतर्गत नागपूर शहरात दि. २० ते २२ मार्च दरम्यान होणाऱ्या सी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शुक्रवारी दि. १० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले 'सी-२० अभिरुप संमेलन' होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात सकाळी १० वाजता हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी सी-२० अभिरुप संमेलनाची अंतिम रंगीत तालिम पार पडली. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी सी-२० अभिरुप संमेलनाची रंगीत तालिम घेण्यात आली. जिल्ह्यातील दोन शासकीय, चार ग्रामीण, आठ निमशासकीय आणि सहा खाजगी अशा एकूण २० शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेचे सात विद्यार्थी आणि पथसंचलन करणारे दोन असे एकूण १४२ विद्यार्थी या 'सी-२० अभिरुप संमेलना'मध्ये सहभागी होणार आहेत.
हेही वाचा;