अंबाजोगाई : बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अंबाजोगाई : बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Published on
Updated on

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय वृद्धाची पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि.०९) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अंबाजोगाई तालुक्यामधील गावातील सहा वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) याने तिच्यावर अत्याचार केला होता. पिडीत मुलीचे पोट दुखू लागल्याने या कुकर्माची वाचा फुटली होती. पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर विष्णू सादुळे याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला तत्काळ बेड्या ठोकून पोलिसांनी सोमवारी (दि.०६) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दि. २१ मार्चपर्यंत आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, अत्याचार प्रकरणाचे अंबाजोगाईत संतप्त पडसाद उमटले होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत आरोपीला कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news