लाईनमनचा हलगर्जीपणा, खांबावर चढवलेला युवक गंभीर जखमी | पुढारी

लाईनमनचा हलगर्जीपणा, खांबावर चढवलेला युवक गंभीर जखमी

वाशिम शहरातील चामुंडा देवी परिसरात खासगी लाईनमन कैलास सरकटे हा विजेचे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला होता. काम करत असतानाच त्याला विजेचा शॉक (Electric shock) लागल्याने तो गंभीर जखमी झाला. खासगी लाईनमन कैलास सरकटे याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

शासकीय लाईनमनच्या हलगर्जीपणामुळे खासगी युवकाला (लाईनमन) विजेचे काम (Electric shock ) करण्यासाठी खांबावर चढविल्याने युवकाचा जीव धोक्यात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या महावितरणने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून जखमी युवकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्थानिक चामुंडा देवी परिसरात काल रविवारी (दि.३) रोजी एका वीज ग्राहकाने कैलास सरकटे यांना बोलावून विजेच्या खांबावर काम करण्यास चढविले. यानंतर काम करत असताना कैलास विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. यानंतर ताबोडतोब त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

फी न भरल्‍यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले

खासगी इसमाला ग्राहकाने का बोलावून घेवून विजेच्या खांबावर चढण्यास सांगितले. याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे वीज वितरणचे अधीक्षक अभियंता तायडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ :  जेष्ठ नागरिक स्पेशल स्टोरी : आयुष्याची सायंकाळ जगा आनंदाने

Back to top button