बंगलोर विद्यापीठ युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी | पुढारी

बंगलोर विद्यापीठ युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बंगलोर येथील जैन विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी  केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी कौतुक केले.

उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय वाद्य संगीत तालवाद्य या प्रकारात अकोल्यातील सिताबाई महाविद्यालयाचा पवन सिडाम, अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा ऋषिकेश दुधाळे यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला. फाईन आर्ट (पोस्टर मेकिंग) स्पर्धेत अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची कु. रुद्राणी बारब्दे हिने व्दितीय, वादविवाद स्पर्धेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी अकोलाची कु. सकिना अली व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावतीची कु. गौरी ककरानिया यांनी व्दितीय, पाश्चिमात्य समूहगान स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाची कु. स्वरश्री केतकर, महिला महाविद्यालय अमरावतीची कु. निकिता मोने, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीची कु. दिव्या बसोले व क्रिश आत्राम, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावतीचा राहुल पवार, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचा वेदांत उमरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे श्री सर्वेश पाठक, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावतीचा ऋषिकेश दुधाळे, अभिजित भावे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली.

विद्यापीठ अधिसभागृहात सत्कार

अधिसभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, प्रशासन विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, डॉ. सोपान वतारे, चमू व्यवस्थापक डॉ. सारिका श्रावणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

                  हेही वाचलंत का ? 

 

Back to top button