हिंगोली : शेख शकील खून प्रकरण : कारमध्येच दोरीने गळा आवळला; आरोपीने दिली कबुली | पुढारी

हिंगोली : शेख शकील खून प्रकरण : कारमध्येच दोरीने गळा आवळला; आरोपीने दिली कबुली

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : शेख शकील शेख खाजा याचा कारमध्येच गळा आवळून खून केल्याची कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख मोहसीन शेख हारून (रा. डोंगरकडा) याने दिली. यासाठी त्याने अन्य दोघांची मदत घेतल्याचेही सांगितले. मदत करणारे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकारी पंढरीनाथ बोधणापोड यांनी सांगितले.

आखाडा बाळापूरच्या जवळ असलेल्या बायपास महामार्गावर मंगळवारी (दि.28) शेख शकील शेख खाजा याचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी मोहसीन खान हारुण खान व शेख शकील याची पत्नी शेख फुल्मा यांना ६ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, शेख शकील याला कारमध्ये घेवून एका धाब्यावर नेले. तिथून वारंगा फाटा दिशेने कळमनुरी तालुक्याच्या आड मार्ग रस्त्यावर आणून गाडीतच त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याचा मृतदेह आखाडा बाळापूर बायपास महामार्गावर आणून टाकला. यासाठी शैलेश व गोपाळ (रा. डोंगरकडा) या दोघांनी मदत केल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा :

Back to top button