ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : ताडकळस परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. परंतू एक महिना होऊनही जायकवाडी धरणातून कँनॉलला पाणी सोडले नसल्याने पाण्याअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून जायकवाडी विभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाला, जायकवाडी धरण तुडूंब भरल्याने धरणाचे पाणी कँनॉलला आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी गहू, भुईमूग, हरभरा पिकांची लागवड केली. परंतू या महिन्यात कँनॉलला पाणी आले नसल्याने परिसरातील ३० ते ४० गावाच्या शिवारातील पिके करपली आहेत. त्यामुळे ताडकळस मायनर ६८ ला तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा :