वर्धा; पुढारी वृत्तसेवा : हिंगणघाट तालुक्यातील खारडी भारडी येथील वाळू घाटात अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाने मोठी कारवाई केली. यात तब्बल नऊ कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये २९ टिप्पर, ३ पोकलँड मशीन, ६ यांत्रिकी बोट, दोन सेक्शन पाईप असा मुद्देमाल जप्त केला.
हिंगणघाट तालुक्यातील खारडी भारडी वाळू घाटात स्थानिक गुन्हेच्या चमूने पाहणी केली. त्यावेळी घाटात वाहने, बोट आढळली. यावेळी पोलीस आणि महसूल विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान घाटाच्या किनाऱ्यावर २३ टिप्पर आढळले. नदी पात्रात तीन पोकलँड, सहा टिप्पर वाळू भरून होते. पोलिसांची चाहूल लागताच तीन टिप्परमधील वाळू खाली केली. घाटात वाळू उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले २९ टिप्पर, तीन पोकलँड, सहा यांत्रिकी बोटी, दोन सेक्शन पाईप व वाळू गाळण्याकरीता असलेल्या दोन चाळण्या असा एकुण ९ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडनेर पोलीस ठाण्यात वाहने, साहित्य जमा करण्यात आले. पुढील कारवाई करता हा मुद्देमाल महसूल प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.
हेही वाचा :