अमरावती : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

File Photo
File Photo
Published on: 
Updated on: 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना दर्यापूर येथे शनिवारी (दि. ७) उघडकीस आली होती. याप्रकरणी चिंट्या उर्फ प्रज्वल हिवराळे (२०, ता. दर्यापूर) या संशयित आरोपीला बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबत मुलीच्या आईने दर्यापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पाच वर्षीय मुलगी खेळत असताना संशयित आरोपी चिंट्या याने तिला आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित मुलगी त्याच्या तावडीतून सुटून रडतच घरी गेली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने दर्यापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news