निवडणूक आयोगाची स्वायत्तता आम्हाला दिसलीच नाही : संजय राऊत | पुढारी

निवडणूक आयोगाची स्वायत्तता आम्हाला दिसलीच नाही : संजय राऊत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  निवडणूक आयोगाच्या सर्व नेमणुका सरकार करते. तरीही आयोगावर आमचा विश्वास आहे. आयोग ही स्वायत्त संस्था आहे. नि:पक्षपातीपणे निर्णय घेतले जातील. आतापर्यंत हे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिसली नाही. तरीही देशाच्या प्रमुख स्तंभावर आम्ही विश्वास ठेवतो, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयावर मात्र आमचा प्रचंड विश्वास असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशात न्याय आणि कायदा जिवंत आहे, असे मी मानतो. त्यामुळे केंद्राच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात जे बेकायदेशीर, घटनाबाह्य घडवले आहे, हा डाव उधळला जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

Back to top button