IndiGo flight : मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या विमान प्रवाशांना अटक

IndiGo flight : मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या विमान प्रवाशांना अटक

पुढारी ऑनलाईन : मद्यप्राशन करून दिल्ली-पाटणा इंडिगो विमानात गोंधळ घालणार्‍या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. इंडिगोच्या व्यवस्थापकाने बिहारमधील पाटणा विमानतळावरील संबंधित प्राधिकरणाकडे याची लेखी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मद्यप्राशन करणाऱ्या या प्रवाशांनी इंडिगोच्या व्यवस्थापकाशी वाद घातला. विमान प्रवासावेळी एअर होस्टेस आणि पायलटसोबत गैरवर्तन केले. अशाप्रकारे फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्यानंतर पाटणा विमानतळ पोलिसांनी 'सीआयएसएफ'च्या मदतीने या दोन प्रवाशांना अटक केली आहे, अशी माहिती पाटणा विमानतळ अधिकार्‍यांनी दिली.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दोन वेगवेगळ्या फ्लाइटमध्ये लघुशंका करण्याच्या दोन मागच्या घटनांनंतर एअर इंडियाला आधीच टीकेचा सामना करावा लागत असताना ही ताजी घटना घडली आहे. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये, मुंबईस्थित एका व्यावसायिकाने बिझनेस क्लासमधील एका वृद्ध महिलेच्या अंगावर पॅंट अनझिप केली आणि लघुशंका केली. हे प्रकरण ताजे असतानाच असा प्रकार घडल्याने विमानसेवेबद्दल प्रवाशांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news