महापुरूषांचा अपमान, मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन सरकारला जाब विचारणार : अजित पवार | पुढारी

महापुरूषांचा अपमान, मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन सरकारला जाब विचारणार : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव आज मांडण्यात येणार आहे. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय आहे. पण आम्हाला ते मान्य नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढला असता तर विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळाला असता, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. महापुरूषांचा अपमान, महिलांवरील अत्याचार, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम हे मुद्दे अंतिम आठवडा प्रस्तावात घेवून सरकारला जाब विचारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पावर म्हणाले की, तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. अजून आठवडा असता तर विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित भागावर चर्चा झाली असती, त्यांना न्याय देता आला असता. अधिवेशनाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आज मांडणार आहे. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये महापुरूषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांबाबत सरकारला जाब विचारणार आहे. गोवा-मुंबई रस्त्याचे १३ वर्ष काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग त्वरीत होऊ शकतो तर गोवा-मुंबई रस्ता का नाही, हा प्रश्न उपस्थित करणार आहे. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button