नागपूर : विरोधकांना विदर्भाचे प्रश्न नकोत, केवळ वैयक्तिक टार्गेट करण्यात रस : प्रवीण दरेकरांचा आरोप | पुढारी

नागपूर : विरोधकांना विदर्भाचे प्रश्न नकोत, केवळ वैयक्तिक टार्गेट करण्यात रस : प्रवीण दरेकरांचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील प्रश्नांसह राज्यातील अनेक महत्त्वाचे मुद्दे विरोधकांनी मांडणे अपेक्षित होते. पण, त्या मुद्यांऐवजी त्यांना केवळ वैयक्तिक टार्गेट करण्यात अधिक रस आहे. विरोधकांना सूर गवसलेला नसल्याने वैयक्तिक आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.

मंगळवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यापाठोपाठ कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनीदेखील गायरान जमीन मातीमोल भावात खासगी व्यक्तीला दिल्याचे प्रकरण विरोधकांनी पुढे केले आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले, ‘विरोधकांनी कितीही आरोप केलेत तरीही उपयोग नाही. महत्त्वाचे मुद्दे सोडून वैयक्तिक टार्गेट करण्यात येत आहे. आमच्याकडेही माल मसाला तयार आहे. विरोधकांनी एक केस केली की आमच्या दोन केस हे ठरलेले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची जागा कुठल्या जागेवर, हे आम्हाला माहिती आहे. आताच सगळे बोलणार नाही. लवकरच यासंदर्भात स्फोट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘सीमाप्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा ठराव आम्ही मांडणार आहोत. राजकारण, पक्ष या पलीकडे जाऊन सीमावासीयांना आश्वस्त करणारा ठराव असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button