पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारची धोरणे आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर पारंपरिक लोकगीते म्हणत निषेध नोंदवला. तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी काँंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.
नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून दुसऱ्या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे. आजही अधिवेशनाचे सत्र सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. टाळांच्या गजरात पारंपारिक गाणे म्हणत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन वाटपात दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करीत सोमवारी विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला होता. आजही सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली.
हेही वाचा :