संजय राऊतांचे साडेतीन महिने आराम केल्याने मानसिक संतुलन बिघडलंय : शंभुराज देसाई | पुढारी

संजय राऊतांचे साडेतीन महिने आराम केल्याने मानसिक संतुलन बिघडलंय : शंभुराज देसाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत जे बोलताता त्यामध्ये काहीच तथ्य नसते. साडेतीन महिने आराम केल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळे ते म्हणाले, संजय राऊत रोज नवा मुद्दा काढतात. सुरूवात एका मुद्यावर करतात आणि त्यानंतर भरकटत दुसऱ्याच मुद्द्याकडे जातात. संजय राऊत जे बोलतात त्यामध्ये काहीच तथ्य नसते. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या परिसारात एक दवाखाना आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नरेश म्हस्के यांना सांगतो. जेणेकरून राऊत यापुढे बेताल बडबड करणे थांबतील. आम्ही त्यांच्या वक्तव्यांना महत्व देत नाही, असे देसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button