अश्लील व्हिडीओ बनवून मैत्रिणीच्या भावी पतीला पाठविला ; तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

अश्लील व्हिडीओ बनवून मैत्रिणीच्या भावी पतीला पाठविला ; तरुणावर गुन्हा दाखल

जालना; पुढारी वृत्तसेवा :  स्नॅपचॅटवरच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. नंतर अश्लील व्हिडीओ बनवून ते एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या भावी पतीला पाठविल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित ओमकार राजाराम शिंदे ( रा. इचलकरंजी) याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची २०२१ मध्ये शिंदेशी स्नॅपचॅटवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की, ते दोघे तासन्तास चॅटिंग करत होते. शिंदेने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडीओ बनविले. ते मुलीला समजलेच नाही. ही बाब घरच्यांना कळाली. नंतर घरच्यांनी मुलीचे लग्न जुळविले. ही बाब ओमकारला माहिती झाली. नंतर त्याने मुलीच्या होणाऱ्या पतीला अश्लील व्हिडीओ पाठविले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात सदरील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button