नागपूर : जी-20 बैठकीसाठी मार्चमध्ये येणार विदेशी पाहुणे : देवेंद्र फडणवीस | पुढारी

नागपूर : जी-20 बैठकीसाठी मार्चमध्ये येणार विदेशी पाहुणे : देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : जी – 20 परिषदेनिमित्त दि. 21 व 22 मार्च 2023 रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने ही सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे तसेच प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्‍यात यावीत. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्‍या.

हेही वाचा :

Back to top button