नगर : पोलिस निरीक्षक दराडेंची बदली रद्द करण्यासाठी राहुरीकर उतरले चक्क रस्त्यावर | पुढारी

नगर : पोलिस निरीक्षक दराडेंची बदली रद्द करण्यासाठी राहुरीकर उतरले चक्क रस्त्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीची विधानसभेत घोषणा झाली. पण राहुरीकर मात्र या निर्णयाच्या विरोधात दिसत आहेत. दराडेंच्या समर्थनार्थ राहुरीतील नागरिकांनी आज चक्का जाम आंदोलन केलं. या चक्का जाम आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल दीड तास लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी रास्ता रोखून धरला होता.

यासाठी दराडेंची बदली केली जाऊ नये…..

राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेगारीवर चांगला वाचक बसवला आहे. याशिवाय रोड रोमिओंचा बंदोबस्तही योग्य प्रकारे केल्याने मुली- महिला निर्भयपणे फिरू शकतात. असे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

गैरसोईबाबत दिलगिरीही !

रस्ता जवळपास दीड तास बंद होता. यामुळे झालेल्या गैरसोयीबाबत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माफी मागितली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Back to top button