नागपूर : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ८ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक पाढे वाचन | पुढारी

नागपूर : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ८ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक पाढे वाचन

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी साम}हिक पाढे वाचन केले. नागपूर महापालिका आणि अग्रेसर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ‘बे एके बे’ हे सामूहिक पाढे वाचनाचे आयोजन महाल येथील चिटणीस पार्क येथे करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, मिलिंद भाकरे आदी उपस्थित होते.

‘बे एके बे’ हे गणितीय आयोजन करण्यात आले. या उपक्रमात चिटणीसपार्क येथे प्रत्यक्षरित्या ८ हजारांहून विद्यार्थी उपस्थित होते. तर ऑनलाईन माध्यमातून भारतातील विविध शहरांसह अमेरिकेतीलही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकूणच उपक्रमात १० हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गणित दिनाच्या अनुषंगाने अग्रेसर फाउंडेशनद्वारे धरमपेठ सायन्स कॉलेजची भिंत रंगविण्यात आली.

अग्रेसर फाउंडेशनद्वारे मागील १५ दिवसांत सर्व शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ५, ६, ७ वी गट आणि इयत्ता ८, ९, १० वी गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांला स्मृतीचिन्ह व पारितोषिक व शहरातील विजेत्यांना ५ हजार प्रथम,
३ हजार द्वितीय व २ हजार तृतीय असे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. ‘व्हीएनआयटी’ नागपूरच्या माध्यमातून रोख बक्षीस देण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button