ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीलाच कौल, भाजप-शिंदे गटाचा दावा खोटा : अजित पवार | पुढारी

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीलाच कौल, भाजप-शिंदे गटाचा दावा खोटा : अजित पवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप-शिंदे गटाला मिळाल्याचा सत्ताधारी पक्षाचा दावा खोटा आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीलाच जनतेने कौल दिला आहे. असा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज ( दि. २१ ) केला.

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आकडेवारीसह माहिती दिली. ते म्हणाले, “ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३२५८ सरपंच निवडून आले. तर भाजप-शिंदे गटाचे ३०१३ सरपंच विजयी झाले. इतर पक्षाला १३६१ जागी विजय मिळाला. यातही ७६१ सरपंच हे महाविकास आघाडीचे आहेत” असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे ४०१९ सरपंच विजयी झाल्याचा दावा पवार यांनी केला आहे. जनतेचा कौल स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आज सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकांकडूनही पेढे वाटण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, भाई जगताप, सचिन अहीर, अबू आझमी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button