भंडारा : हरदोलीत चाकूचा धाक दाखवून तीन लाखांचा ऐवज लुटला | पुढारी

भंडारा : हरदोलीत चाकूचा धाक दाखवून तीन लाखांचा ऐवज लुटला

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : तुमसर तालुक्यातील हरदोली (सिहोरा) येथे चाकूचा धाक दाखवत तीन लाख रुपयांचा ऐवज लुटल्‍याची घटना घडली. याप्रकरणी सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज (गुरुवारी) घटनास्थळाची पाहणी केली. या जबरी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्‍ये घबराट पसरली आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, हरदोली येथील सेवानिवृत्त शिक्षक कन्हैयालाल येळे हे आपल्या कुटूंबासह राहतात. मंगळवार (दि.२९) रात्री  बंद दरवाजा ठोठावत तीन चोरटे घरात शिरले. येळे कुटुंबीयांना धारधार चाकूचा धाक दाखवत सोने- चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लुटत चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे तपास करीत आहेत.

       हेही वाचलंत का ?

 

Back to top button