रामदेव बाबा यांच्या विरोधात संताप सुरूच, मनसेने फेकली फलकावर शाई | पुढारी

रामदेव बाबा यांच्या विरोधात संताप सुरूच, मनसेने फेकली फलकावर शाई

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : ठाणे येथे योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबांनी महिलांबाबत बेताल व्यक्तव्य केले होते. यानंतर रामदेव बाबा यांच्याबादृल  विरोध वाढला आणि अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु त्‍याच्याबाबत संताप कायम आहे. नागपुरात आज पतंजली स्टोअर्ससमोर मनसे शहर आणि महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्यासह महिला सेनेच्या मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात सक्करदरा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आता बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करीत लोकांची, विरोधकांची नाराजी ओढवून घेतली आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले.

सक्करदरा पोलीस स्टेशनच्या बाजूला पतंजली स्टोअरच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना मनसैनिक आक्रमक झाले होते. काहींनी बाबा रामदेव यांच्या बॅनरवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, रामदेव बाबांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत, याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, असे महिला आयोगाने नोटिसमध्ये म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या या विधानाची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.

हेही वाचा  

नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड 

नगर: ग्रामसुरक्षा दलामुळे गुन्हेगारांवर वचक; कोळगाव येथे ग्रामस्थांसमोर प्रात्यक्षिक

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

Back to top button