नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड | पुढारी

नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड

नाशिक (देवळा: पुढारी वृत्तसेवा

देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित, कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना व इतर शैक्षणिक विभागातील सुमारे १४ विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ही निवड प्रक्रिया पार पडली.

देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून‌, अग्निविरांची ही निवड म्हणजे फक्त महाविद्यालयासाठीच अभिमानाची बाब नसून संपूर्ण देवळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. मालती आहेर यांनी केले. या सोहळ्यासाठी उपप्राचार्य विजयकुमार जोशी, उपप्राचार्य पी. एन. ठाकरे , डॉ.संजय बनसोडे, डॉ. डी. के. आहेर, प्रा.वामन काकवीपुरे, प्रा.जालिंदर कडू, डॉ. दीपिका शिंदे आदींसह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .. डॉ. विलास वाहुळे यांनी आभार मानले.

यशवंत विद्यार्थी असे…

रोशन शिरसाट (मेशी), निलेश वाघ (ठेंगोडा), तुषार पवार (खर्डे), सचिन पवार (खर्डे), चेतनानंद धोंडगे (गुंजाळ नगर), सौरभ चव्हाण (खर्डे), सुरेश गिरासे (वासोळ), प्रवीण जाधव (खर्डे), ओमकार जाधव (मकरंदवाडी), वैभव अहिरराव (मकरंदवाडी), मयूर शिंदे (वरवंडी), सुधीर पवार (भऊर), ज्ञानेश्वर सोनवणे (वडाळा), राहुल ठाकरे (पिंपळगाव) यांची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button