

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील समाधान कांबळे याला उच्च शिक्षणासाठी १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. समाधानच्या घरची परिस्थिती हालखीची होती. आता शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे समाधानच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. सर्व स्तरांतून त्याचे काैतुक हाेत आहे.
वाशिम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे येथील शेतकरी कुटुंबातील समाधानचे आई-वडील शेतात मजूरी करतात. मजुरीच्या पैशातून त्यांनी समाधानला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. पुण्यातील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमधून त्याने सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केले. इंजिनियरिंगमध्ये त्याने द्वितीय क्रमांक पटकवला. समाधान याला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. आई वडील आणि पाच बहिणी असे त्याचे कुटुंब आहे.
हेही वाचा