... तर देशातील महागाई कमी होईल : केजरीवालांचा पंतप्रधानांना टोला | पुढारी

... तर देशातील महागाई कमी होईल : केजरीवालांचा पंतप्रधानांना टोला

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-दिवसभरातून १८ तास काम करणारे पंतप्रधान केजरीवालांना काम करण्यापासून कसे रोखता येईल याचाच विचार करतात. पंरतु, १८ पैकी २ तास जरी पंतप्रधानांनी देशासाठी काम केले तर देशातील महागाई कमी होईल, असा टोला आज ( दि. २६) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लगावला.

दिल्लीतील अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याचा तपास करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे नाव नाही. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्‍हणाले, “सीबीआयाने एकप्रकारे मनिष सिसोदियांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यांच्याविरोधात एका पैशांचाही घोटाळा मिळाला नाही. सिसोदियांना अटक व्हावी, अशी पंतप्रधानांची इच्छा होती. पंरतु, केजरीवाल आणि आमचा पक्ष कट्टर प्रामाणिक आहे. देशाच्या राजकारणात एकही नेता कट्टर प्रामाणिक असल्याचे म्हणू शकत नाही. पूर्ण फाईली तपासून घ्यावात. काही सापडणार नाही, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

सिसोदियांविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे ८०० अधिकारी या प्रकरणावर रात्रदिवस काम करीत आहे. पंरतु, त्‍यांच्‍याविरोधात  पुरावे मिळाले नाहीत. निवडणुकीसाठी आठवड्याभराहून कमी वेळ शिल्लक आहे. पंरतु, एकही पुरावा सिसोदियांविरोधात मिळाला असता, तर याचे भांडवल केले असते, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

५०० हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्‍यात आल्‍या. सिसोदियांच्या घराची भिंत तोडून पैशांचा शोध घेण्यात आला. गाद्या फाडण्यात आल्या, बॅंक लॉकर तपासण्यात आले, नातेवाईक तसेच गावात देखील शोधाशोध करण्यात आली.पंरतु, पुरावे मिळाले नाही, असे केजरीवाल म्हणाले.अजूनही तपास सुरू आहे. याप्रकरणात पुरवणी आरोपपत्र सादर केले जावू शकते. पंरतु, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत पंतप्रधानांनी आम्हचा तपास करावा.आयुष्यभर तपास सुरू राहील.आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात २५ पैशांचाही घोटाळा आढळलेला नाही. पंतप्रधान स्वत: या प्रकरणावर नजर ठेवून आहेत. ते स्वत: सीबीआय तसेच ईडीच्या संचालकांना भेटतात, असा दावा केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button