सोलापूर: ॲड.सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक | पुढारी

सोलापूर: ॲड.सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यासह विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे, या मागणीसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. या वेळी सदावर्ते यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. हे अचानकपणे घडल्याने एकच गोंधळ उडाला.

सोलापूरच्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व त्यांचे सहकारी सदावर्ते यांच्या पाठीमागे उभे होते. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्ते यांच्‍यावर शाई फेकण्‍यात आली.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व तसेच महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना सदावर्ते यांना संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे म्हणत सोलापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केले. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रमाणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  : 

Back to top button