चंद्रपूर : अभिनेते सयाजी शिंदे यांची ताडोबा सफारी | पुढारी

चंद्रपूर : अभिनेते सयाजी शिंदे यांची ताडोबा सफारी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच ताडोबा व्याघ्र अभयारण्यात कोअर झोनमध्ये सफारी केली. यावेळी वाघाचे दर्शन झाल्‍याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

अभिनेते सयाजी शिंदे आपल्या परिवारासोबत ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी मोहुर्ली गेटमधून ताडोबात आले. दुपारी कोअर झोनमध्ये जंगल भ्रमंती केली असता त्यांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी रात्री भामडेळी येथील सराई टायगर रिसार्ट येथे मुक्काम केला. मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी बफर झोन मध्ये त्यांनी परत सफारी केली. त्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना झाले.

मुक्कामादरम्यान सयाजी शिंदे यांना भेट म्हणून ताडोबा आर्गेनिक फुडस् ॲन्ड मटेरियल या फर्मचे संचालक सुयोग भोयर यांनी ताडोबा जंगलातील आदिवासींनी गोळा केलेला मध दिला. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने ताडोबात वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी हाेत आहे.

हेही वाचा  :

Back to top button