बीड : उमरी येथील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

बीड : उमरी येथील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

केज; पुढारी वृत्तसेवा : उमरी (केज) येथील रहिवासी व पुणे येथील सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचे ह्रदयविकाराने मंगळवारी निधन झाले. मच्छिंद्र मुरलीधर मुळे असे त्‍यांचे नाव आहे.

मच्छिंद्र मुरलीधर मुळे (वय ४०) हे पुणे सैन्यदलात सेवेत होते. मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र मुळे यांच्यावर उमरी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार असून त्यांचे मोठे बंधूही सैन्यात कार्यरत आहेत.

 हेही वाचा :

Back to top button