गडचिरोली : कोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : कोरची तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर मसेली गावानजीक असलेल्या सावली येथील जंगलात वीज कोसळून शंभराहून अधिक शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल(ता.९) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात. यंदा हे मेंढपाळ दोन डेरे घालून वसलेले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात, तर दुसरा डेरा सावली परिसरात आहे. दोन्ही डेऱ्यांमध्ये ७-८ परिवारांचा समावेश आहे.
- डीएसपीचा महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पुलमध्ये खुल्लम खुल्ला रंगेलपणा, video व्हायरल!
- औरंगाबाद : दोन दुचाकीची समोरासमोर धडक, २ ठार
९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. अशातच अचानक डेऱ्याजवळच वीज कोसळल्याने जवळपास ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्या. यामुळे मेंढपाळांचे सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- जळगाव : हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या, पोलीस पतीला अटक
- टी-20 वर्ल्डकपमधून युजवेंद्र चहल याला डच्चू मिळाल्यानंतर पत्नी धनश्रीची पहिली प्रतिक्रिया
घटनेची माहिती मिळताच कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी २ ते ३ किलोमीटर पायी चालून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचलत का :
- नाशिक : पूरग्रस्त शेतकरी महिलेची आत्महत्या
- फसवणूक : मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगून लुबाडले ६५ लाख रुपये
- पीएम मोदी वाढदिनी ५ कोटी ‘धन्यवाद मोदीजी’ पोस्टकार्ड पाठवली जाणार
मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगून लुबाडले ६५ लाख रुपये https://t.co/E2GeceapnD #pudharinews
— Pudhari (@pudharionline) September 10, 2021