फसवणूक : मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगून लुबाडले ६५ लाख रुपये | पुढारी

फसवणूक : मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगून लुबाडले ६५ लाख रुपये

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मानव विकास मंत्रालय, दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत तसेच नविन शाळेची मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका संस्थाचालकांकडून सुमारे ६५ लाख रूपये लुबाडण्यात आले. याप्रकरणी धळे व नाशिक येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अशोक हिरालाल पाटील (वय ६०) धंदा शेती रा. कुढावद ता. शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.  पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी बन्सीलाल सोनवणे, अमोल सोनवणे यांनी दिपक देवरे हा मानव विकास मंत्रालय, दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली.

त्या माध्यमातून जय देवमोगरा माता बहुउद्देशिय संस्था, कुढावद ता. शहादा जि. नंदुरबार या संस्थेच्या नावाने मानव विकास मंत्रालय दिल्ली येथून मॉडेल स्कूल सुरू करण्याची मंजुरी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. २०१३ पासून २०१९ पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी रक्कम घेत तिघांनी संगनमत करून एकूण ६५ लाख रूपये लुबाडले. असे फिर्यादीत म्हटले आहे. मंजुरी मिळवून दिली नाही म्हणून पाटील यांनी आरोपींकडे वारंवार पैश्यांची मागणी केली.

परंतु त्यांनी आजपोवतो पैसे परत केले नाही. तेव्हा पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. म्हणून आज त्यांनी फिर्याद दाखल केली. व त्यानूसार बन्सीलाला सखाराम सोनवणे, अमोल बन्सीलाल सोनवणे, दोन्ही रा. प्लॉट क्र.४५ श्रीराम कॉलनी, वाडीभोकर रोड, धुळे जि. धुळे आणि दीपक तुकाराम देवरे रा. महादेव हॉसिंग सोसायटी त्रिमुर्ती चौक, नाशिक या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचलत का :

कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर

Back to top button