अमरावती : बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद पेटला; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल | पुढारी

अमरावती : बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद पेटला; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी रवी राणांविरोधात बच्चू कडू यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे, आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, असे आव्हानही आमदार कडू यांनी दिले आहे.

रवी राणाने जे आरोप केले आहेत ते त्याने सिद्ध करावे. माझ्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी त्याला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देतो. एक तारखेला मी अमरावतीतील टाऊन हॉलमध्ये येतो. तिथे त्याने आपले पुरावे सादर करावेत. त्याने केलेले आरोप सिद्ध झाले, तर मी त्याच्या घरी भांडी घासेन. रवी राणा हा सत्तेत येऊन दुधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल, तर मी त्याला तयार आहे. जिथे बोलवेल तिथे जाण्यास तयार आहे, असे आमदार कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button