Diwali Festival : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर या सुरेख रांगोळ्यांनी सजवा आंगण! | पुढारी

Diwali Festival : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर या सुरेख रांगोळ्यांनी सजवा आंगण!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या सर्वांना खूप-खूप हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली सर्वांना मंगलमय जावो, अशा शुभकामना. दिवाळी हा दिव्यांचा सण पण हा अर्धवट वाटतो जर अंगणात रांगोळ्या नसतील तर. रांगोळी हे फक्त कलेपुरते किंवा सजवण्यापुरते मर्यादित नाही. तर भारतीयांसाठी रांगोळीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व खूप आहे. तसेच ते आतिथ्य आणि स्वागत करण्याचे माध्यम आहे. त्यामुळेच दीपावलीला माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी हे रांगोळ्याचे खास कलेक्शन तुमच्यासाठी…

Diwali Festival : रांगोळी ही भारतीयांची पारंपारिक कला आहे. मात्र काळानुसार याचे स्वरुप बदलत गेले. पूर्वी ठिपक्यांच्या रांगोळ्या असायच्या. नंतर पाचबोटी रांगोळ्या आल्या. पुढे पाचबोटी रांगोळ्यांची जागा वेगवेगळ्या डिझाइन आणि चित्र किंवा देखाव्यांनी घेतली. तर आता सध्याचा ट्रेंड आहे तो फुलांच्या रांगोळ्यांचा….

Diwali Festival : फुलांच्या रांगोळ्या या अगदी झटपट होतात. त्यांची रचना करणे खूप सोपे असते. यामध्ये झेंडू, प्राजक्ताची फुले, शेवंती, गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्या पाने यांचा उपयोग करून आकर्षक डिझाईन बनवता येते. तसेच या काढायला अगदी सोप्या असतात.

Diwali Festival : फुलांचा गालिचा देखिल तयार करता येतो.

 

Back to top button