विदर्भात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे वर्चस्व | पुढारी

विदर्भात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे वर्चस्व

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे वर्चस्व राखले आहे. त्यामुळे विदर्भाच्या ग्रामीण भागात भाजपचे प्राबल्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विदर्भाच्या चार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल खालील प्रमाणे :

नागपूर जिल्हा ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा व काँग्रेस समर्थीत प्रत्येकी सहा उमेदवार विजयी

नागपूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत ६, काँग्रेस समर्थीत ६, शिवसेना उद्धव ठाकरे १, अपक्ष, १ आणि १ उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील एक, कुही तालुक्यातील आठ आणि भिवापूर तालुक्यातील सहा अशा १५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.

भंडारा जिल्ह्यात शिंदे शिवसेना गटाचे वर्चस्व

भंडारा जिल्ह्यात पार पडलेल्या १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-शिंदे गटाने ११ ग्रामपंचायतीवर तर काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर समर्थित पॅनलने भंडारा विधानसभा क्षेत्रातील ११ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. तर काँग्रेसने १९ पैकी नऊ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह मतदार संघातील साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला या एकमेव निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीत भाजप समर्थित पॅनलने झेंडा रोवला.

वर्धा जिल्ह्यात चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर चार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता

वर्धा जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत चार ग्रामपंचायतीत काँग्रेस तर चार ग्रामपंचायतीत भाजपला सत्ता मिळाली. आर्वी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत स्थानिक पॅनलच्या उमेदवार विजयी झाल्या. येथे भाजप, काँग्रेस दोन्हीकडून दावा केल्या जात होता.

जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात दोन आणि आर्वी तालुक्यात सात ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. वर्धा तालुक्यातील सालोड आणि बोरगाव (नां.) येथे भाजपची सत्ता आली. आर्वी तालुक्यात सातपैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. दोन ग्रामपंचायतीत भाजपला सत्ता मिळाली. आर्वी तालुक्यात भाजपचे आमदार दादाराव केचे, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात 36 तर भाजपच्या वाट्याला 24 ग्राम पंचायती

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी सात तालुक्यातील ९२ ग्राम पंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३६ ग्राम पंचायतीवर ताबा मिळविला तर भाजपने २४ ग्राम पंचायती ताब्यात घेतल्या. गोंडवाणा पार्टीने १० आणि शेतकरी संघटनेने ७ ग्राम पंचायती ताब्यात घेतल्या आहेत. राष्ट्रवादी , गोंडवाणा वंचीत युती, वंचित, भाजप गोंडवाणा युती तसेच एका ग्राम पंचायतीवर शिवसेना व ४ ग्राम पंचायती अपक्षांच्या हातात गेल्या आहेत. जिह्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे.

Back to top button