बुलढाणा : ट्रक-दुचाकीच्या धडकेत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ठार | पुढारी

बुलढाणा : ट्रक-दुचाकीच्या धडकेत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ठार

बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा शहरालगत येळगावच्या वळणावर समोरासमोर ट्रक व दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये निवृत्त पाेलीस उपनिरीक्षक यांचा मृत्‍यू झाला. विनोद काशिनाथ पाटील (वय ५५) असे त्‍याचे नाव आहे. या अपघातानंतर संबंधित ट्रक (क्र.एम.पी.०९, एच एच ८०४४) हा घटनास्थळीच उभा ठेऊन ट्रक चालक पसार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक सुंदरखेड परिसरातील रहिवासी विनाेद पाटील यांनी  तीन महिन्यांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली हाेती. विनाेद पाटील  निर्माल्य विसर्जित करण्यासाठी दुचाकीने पैनगंगा नदीपात्राच्या दिशेने जात होते. राज्यमार्गावर चिखलीकडून आलेला ट्रक व विनोद पाटील यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. ते  गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्यांना आसपासच्या नागरिकांनी तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. या दुर्घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त हाेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button