तुमच्या साथीने पुन्हा पक्षाची उभारणी करू : उद्धव ठाकरेंनी साधला माजी आमदारांशी संवाद

तुमच्या साथीने पुन्हा पक्षाची उभारणी करू : उद्धव ठाकरेंनी साधला माजी आमदारांशी संवाद

परंडा; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह आजी व माजी आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी 'महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा जिवंत आहे', असा संदेश दिला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आजी व माजी आमदारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. पक्षात कोण आले, कोण गेले याची आता पर्वा नाही. तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने पक्षाची उभारणी करणार असून लवकरच भेटीसाठी येणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना यावेळी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजूनही महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा जिवंत आहे. ती निष्ठा विकत घेतली जाऊ शकत नाही. यांचे जिवंत दर्शन तुम्ही घडविले. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, ज्या लोकांना आपण काही दिले, ते सर्व सोडून गेले. मात्र, ज्यांनी आपल्याला दिले. ते मात्र सोबत राहिले आहेत. आता मला कशाचीही चिंता नाही. तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने पक्षांची बांधणी करणार आहे, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news