Nightlife In Delhi : दिल्लीतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू राहणार | पुढारी

Nightlife In Delhi : दिल्लीतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू राहणार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी २४ तास सुमारे ३०० आस्थापना सुरू करण्यास परवानगी (Nightlife In Delhi) दिली आहे. यामध्ये ऑनलाइन शॉपिंग, डिलिव्हरी शॉप्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि वाहतूक सेवांशी संबंधित बाबींचा समावेश आहे. रविवारी (दि.९) उपराज्यपाल कार्यालयाकडून या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यात आली. उपराज्यपालांनी सुमारे ३१४ अर्ज मंजूर केले आहेत. यातील काही २०१६ पासून प्रलंबित होते. यासोबतच या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित अधिसूचना ७ दिवसांच्या आत जारी करण्याचे आदेशही उपराज्यपालांनी दिले आहेत.

अनेक आस्थापनांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी (Nightlife In Delhi) देताना, उपराज्यपाल सक्सेना यांनी आतापर्यंत या आस्थापनांना परवानगी देण्याच्या विलंबाची गंभीर दखल घेतली आहे. गुंतवणूकदारांना सुविधा देण्यासाठी आणि दिल्लीत व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अशा अर्जांवर विहित मुदतीत निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून दिल्लीतील अनेक महत्त्वाची आस्थापने २४ तास आणि ७ दिवस सुरू राहतील.

याबाबतचा प्रस्ताव मंजूर करताना, उपराज्यपाल सक्सेना यांनी असे म्हटले आहे की, या आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यास होणारा विलंब कामगार विभाग अव्यावसायिक वृत्ती दाखवत असल्याचे दिसून येते. विभाग अर्जांवर प्रक्रिया करताना ‘पिक अँड चॉइस पॉलिसी’चे पालन करत होता. अशा व्यवस्थेत भ्रष्ट व्यवहारही घडू शकतात. दरम्यान, याबाबतचे 2016 मध्ये 18, 2017 मध्ये 26, 2018 मध्ये 83 अर्ज, 2019 मध्ये 25, 2020 मध्ये 04 आणि 2021 मध्ये 74 अर्ज असे एकूण 346 अर्ज प्रलंबित होते.

हेही वाचा :

Back to top button