रायगड : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट; ज्‍युनियर इंजिनियरचा मृत्यू, दोन जखमी | पुढारी

रायगड : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट; ज्‍युनियर इंजिनियरचा मृत्यू, दोन जखमी

उरण(रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात आज ( दि. ९ ) बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट  झाला. यामध्ये एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले . प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. उपचारादरम्यान ज्‍युनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला.

रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते. दुपारी 12 ते च्या 12:30 च्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु होते. या वे‍‍ळी बॉयलर मधीलदाब अचानकपणे वाढला. त्यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी  पंपाचा स्‍फोट झाला. बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण हे संबधीत खात्याकडून करून अहवाल घेवून स्‍थानिक प्रशासनाला देणे अनिवार्य असते. परंतु 35 वर्षाहून अधिक काळ या बॉयलरची तपासणी करण्यात आली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

या ठिकाणी काम करीत असलेले ज्‍युनियर इंजिनियर विवेक धुमाळे टेक्निशियन, कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी),विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात केले आहे. दोघांना प्राथमिक उपचारानंतर त्याना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथे ऐरोली रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल ‍‍केले आहे. उपचारादरम्यान ज्‍युनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

Back to top button