वाशिम; पुढारी वृत्तसेवा : खा.भावना गवळी यांच्या संस्थेच्या चौकशी करीत ईडीची टीम वाशिममध्ये दाखल झाली आहे. वाशिम मधील धर्मदाय आयुक्त कार्यालयात खा.भावना गवळी यांच्या शंभर कोटींचा घोटाळा प्रकरणी संस्थेच्या आज चौकशीसाठी ईडीची टीम दाखल झाली आहे.
चार दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांच्या रीसोड शहरातील रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटी आणि देगाव येथील आयुर्वेदिक कॉलेज आणि बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना वर ईडीची कारवाई झाली होती.
आज वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पेपरची पडताळणी करण्यासाठी ईडीची टीम आली आहे. तर अध्याप तपासणी सुरू आहे.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ – वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे.
गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
यानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.