संजय राऊत जगाचे नेते; चंद्रकांत पाटील यांची टीका | पुढारी

संजय राऊत जगाचे नेते; चंद्रकांत पाटील यांची टीका

अकोला, पुढारी ऑनलाईन: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जगाचे नेते आहेत, त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, अशी उपहासात्मक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. अकोला येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

बेळगाव महापालिकेत शिवसेना ३० पेक्षाही जास्त जागा जिंकेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

राऊत हे देशाचे, राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नेते आहेत, त्यांना सगळं कळतं, त्यांचा तर अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा टोला लगावला.

कोकणात नारायण राणे समर्थकांना शिवसेनेने फोडले आहे, याकडे पाटील यांचे लक्ष वेधले गेले.

त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, नारायण राणे यांचे समर्थक फोडले की कसे याची मला माहिती नाही.

पण जर असे झाले असेल तर नारायण राणे असे प्रहार झेलण्यास सक्षम आहेत.

यावेळी पाटील यांनी ओबीसी आरक्षण, परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात आलेली ईडीची नोटीस आदी बाबींवर भाष्य केले.

भाजपकडून संजय राऊत लक्ष्य

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता संजय राऊत यांना टार्गेट केले जात आहे.

राऊत हेच युतीत बिघाडी करणारे नेते आहेत असा पक्का समज करून भाजप त्यांना टार्गेट केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांच करेक्ट कार्यक्रम करू असा ईशारा दिला होता.

त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राऊत याच्यावर टीका करत आहेत.

संजय राऊत हे सामानमधून टीका करता त्याचा प्रतिवाद आम्ही करायला लागलो तर त्यांना जड जाईल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा: 

Back to top button