वाशिम : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा सांडव्यात बुडून मृत्यू | पुढारी

वाशिम : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा सांडव्यात बुडून मृत्यू

वाशिम, पुढारी वृत्‍तसेवा : एकबुर्जी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या ठिकाणी असलेल्या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी व पोहण्यासाठी प्रशासनाचा आदेश न जुमानता येतात. मात्र तेथे धोका असल्‍याने प्रशासनाने जाण्यास मनाई केली आहे.

प्रशासनाने केलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करून शहरातील पाच ते सहा युवक सोमवारी दुपारी 4:00 वाजता सांडव्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी शेख शोएब शेख अन्सार (वय 18) आणि शेख आवेश शेख अनिस (वय 15) या दोन जणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने उडी घेतण्याना तोल गेला आणि ते दगडावर पडले. त्‍यात त्यांच्या डोक्यला गंभीर इजा होऊन त्‍यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. तर भटउमरा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीला जोडणाऱ्या नाल्याला पूर येऊन गावी जाणारे नागरिक अडकले आहेत.

हेही वाचा 

राजधानी दिल्लीत शिक्षण घोटाळा; भाजपचा आम आदमी पार्टीवर आरोप 

झारखंड : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून १७ वर्षीय तरुणीला पेटवले; पीडितेच्या मृत्यूनंतर शहरात तणाव 

कोल्‍हापूर : म्हासुर्लीत तीन एकरातील भातपीक गव्यांकडून फस्त 

Back to top button