कोल्‍हापूर : म्हासुर्लीत तीन एकरातील भातपीक गव्यांकडून फस्त | पुढारी

कोल्‍हापूर : म्हासुर्लीत तीन एकरातील भातपीक गव्यांकडून फस्त

धामोड (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील तिन एकरहुन अधिक क्षेत्रातील भात पिक गव्यांनी फस्त केले आहे. दहा ते पंधरा गव्यांच्या कळपाने पोटरीला आलेल्या भात पिकाकडे मोर्चा वळविल्यामुळे म्हासुर्ली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे .

म्हासुर्ली व झापाचीवाडी जवळच असलेल्या शिवार नावाच्या शेतातील संजय अहमद मलकापुरे, जयबुन मोहीदीन मलकापुरे, तुकाराम लहु चौगले, कृष्णात चौगले, शिवाजी परिट आदी शेतकऱ्यांच्या सुमारे तिन एकराहुन अधिक क्षेत्रातील भात पिक फस्त करून नासाडी केली आहे. या परिसरातील भात पिक पोटरीला आले आहे. त्यामुळे गव्यांनी आपला मोर्चा भात पिकाकडे वळवला आहे असे शेतक-यांनी सांगितले. हातातोंडाशी आलेले पिक गव्यांनी खाल्ल्याने पुढील वर्षीच्या पोटगीचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . व उरलेले पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री पिकांची राखण सुरु केली आहे.

याबाबत म्हासुर्ली परिक्षेत्रचे वनपाल विश्वास पाटील यांनी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असुन सर्वांना योग्य ती भरपाई देण्यात येईल असे सांगितले आहे.

हेही  वाचा

कोल्‍हापूर : न्यू मेल्टिंग सेंटर कंपनीला सात कोटी रुपयांचा गंडा

कोल्‍हापूर : ‘त्या’ शिक्षकाला 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

कोल्‍हापूर : राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे : मंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील

Back to top button