चंद्रपूर : अस्थी विसर्जनासाठी आलेल्या युवकावर काळाचा घाला, मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात नदीत बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : अस्थी विसर्जनासाठी आलेल्या युवकावर काळाचा घाला, मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात नदीत बुडून मृत्यू

चंद्रपूर;  पुढारी वृत्तसेवा: घुग्घुस जवळील वढा येथे अस्थी विर्सजनासाठी आलेल्या एका युवकाचा बुधवारी (१७ ऑगस्ट) नदीत बुडून मृत्यू झाला. विशाल चौधरी (३०, रा. ताडाली )असे त्‍याचे नाव आहे.

घुग्घुस येथून जवळच असलेले वढा तीर्थक्षेत्र आहे. येथे त्रिवेणी संगमाची नदी आहे. येथे अस्थी विर्सजनासाठी विशाल चौधरी आले होते. अस्थी विसर्जनानंतर आंघोळीसाठी विशाल चौधरी याचा मित्र पाण्यात उतरला होता.  परंतु त्याला खोल भागातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो पाण्यात बुडत असताना  मित्राला वाचविण्यासाठी विशाल चौधरी याने प्रयत्न केले. मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात विशाल खोलगट भागातील पाण्यात बुडाला. मित्राला वाचवताना  विशालचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती  ठाणेदार बबन पुसाटे यांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंग, मंगेश निरंजने, प्रफुल पिंपळकर हे घटनास्थळी दाखल झाले झाले. लगेच बचाव पथकास पाचरण करण्यात आले. बचाव पथकाने शोधमोहीम राबविली असता बचाव पथकास विशाल चौधरी यांचा मृतदेह मिळाला.

हेही वाचलंत का?

Back to top button