रायगडच्या समुद्रात अनोळखी बोटी दिसल्या, दोन्ही बोटी रिकाम्या | पुढारी

रायगडच्या समुद्रात अनोळखी बोटी दिसल्या, दोन्ही बोटी रिकाम्या

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट आढळली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आली आहे. दोन्ही बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाहीत. कोस्ट गार्ड व मेरिटाईम बोर्ड यांना याबाबत सूचना देण्यात आलेली आहे. पोलिस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

Back to top button