

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य सेनानींचं कार्य सर्व पिढीला समजायला हवं, स्वातंत्र्य सेनानींच कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा समाजाचा झाला पाहिजे. देशाच्या इतिहासाचे सिंहावलोकन झाले पाहिजे. अनेकांचे कार्य हे काळाच्या आड लपले आहे. पंतप्रधान यांनी आदीवासी नेते बिरसा मुंडा यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचायला हवा यासाठी आदीवासी दिनानिमीत्त त्यांची जयंती साजरी करणायाचा निर्णय घेतला आहे. आपल्या आदिवासी समाजातील अनेक लोक ब्रिटीशांविरुद्ध लढले पण त्यांची माहिती कुठे पाहायला मिळत नाही. या सर्व लोकांचा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे. हा प्रयत्न आझादी का महोत्सवनिमीत्त सुरु आहे. येत्या काळात आपला देश कुठे पोहचला आहे हे आपल्या पिढीला माहीत असायला हवं. बापूंना अपेक्षित असं परिवर्तन देशात घडतय. आपल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींच कार्य लोकांनी समजायला हवं. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार, असे वक्तव्यही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यानिर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव तयार करण्यात येतील. असल्याचेही ते म्हणाले.समाजातील प्रत्येक घटक जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करेल तेव्हाच हा अमृत महोत्सव यशस्वी होईल. येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला इतिहास पोहोचवायचा असल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.
हेही वाचलंत का?