गडचिरोलीत पुन्हा मुसळधार पाऊस, चामोर्शी तालुक्यातील अनेक मार्ग बंद | पुढारी

गडचिरोलीत पुन्हा मुसळधार पाऊस, चामोर्शी तालुक्यातील अनेक मार्ग बंद

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागालाशुक्रवारी ( दि. २२) रात्रीपासून आज दुपारपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले. दरम्यान, चामोर्शी तालुक्यातील अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत.शिवाय पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पूर आल्याने आलापल्ली-भामरागड या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. दोन शेतकरी पुरात अडकले होते. काही तासांनंतर ते सुखरूप बाहेर पडले.

मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा नदी, नाले ओसंडून वाहत असून, शेतांमध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरले आहे. आज सकाळी येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत आणि त्यांचा मुलगा संदीप राऊत हे भात रोवणीसाठी शेतावर गेले होते. परंतु मुसळधार पाऊस पडल्याने अल्पावधीत शेते तुडुंब भरली. यामुळे दोघांनाही गावाकडे येणे शक्य झाले नाही. त्यांनी उंच भागावर आश्रय घेतला. काही तासांनंतर ते सुखरूप बाहेर पडले. मागील चोवीस तासांत चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ९६.१ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा :

Back to top button