कोंबड्या विकणाऱ्या रियाजची कोटींची उड्डाणे, आमदाराला टोपी घालण्याचा प्रयत्न अंगलट | पुढारी

कोंबड्या विकणाऱ्या रियाजची कोटींची उड्डाणे, आमदाराला टोपी घालण्याचा प्रयत्न अंगलट

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा : कॅबिनेट मंत्रिपदाच्या आमिषाने आमदाराकडे शंभर कोटींची मागणी करणार्‍या पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील रियाज अल्लाबक्ष शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे कारनामे बाहेर येत
आहेत.

रियाज शेख हा शिरोलीतील एक सामान्य तरुण होता. सुरुवातीला कोल्हापूर येथील कोंबडी बाजारात कोंबड्या विकत होता. त्यात हाती काही राहत नसल्याने तो व्हिडीओ पार्लरमध्ये काम करू लागला. यादरम्यान तो बॉक्साईट उद्योजकांच्या संपर्कात आला. त्यातून कामगार ते बॉक्साईट व्यावसायिक असा त्याने प्रवास केला. यातून त्याची जीवनशैली बदलली. तो आलिशान वाहनातून फिरू लागला.

या श्रीमंतीच्या जोरावर त्याने काही प्रकरणात थेट पोलिसांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी फसवणूकप्रकरणी त्याला अटक झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली.

Back to top button