

पुढारी ऑनलाइन डेस्क : नुकत्याच रिलीज झालेल्या रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला समशेरा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच आपटला आहे. दर्शकांनी समशेराला पूर्णपणे नाकारले आहे. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी समशेराचे शो कँसल करावे लागले आहे. त्यामुळे समशेराची वाटचाल फ्लॉपच्या दिशेने होत आहे, असे म्हणू शकतो. मात्र, काही समीक्षकांनी आणखी काही काळ वाट पाहणे योग्य ठरले आहे असे म्हटले आहे.
रणवीर कपूर मुख्य भूमिकेत असणा-या समशेरा हा बिग बजेट चित्रपट या आठवड्यात रिलीज झाला. रणवीर कपूर या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनी कमबॅक करत होता. त्यामुळे त्याला देखील चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाकडे दर्शकांनी पाठ फिरवली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील रणवीर कपूरच्या लूकबाबत खूप चर्चा होती. तर वाणी कपूरचे सौंदर्याची मोहिनी दर्शकांना आकर्षित करत होती. याशिवाय संजय दत्तची भूमिका हे देखील मोठे आकर्षण होते. एकूणच हा चित्रपट बिग बजेट ठरला होता. या चित्रपटाचे एकूण बजेट 150 करोडच्या घरात आहे.
रणवीर कपूर चारवर्षांपूर्वी संजू या चित्रपटात संजय दत्त याच्या भूमिकेत होता. संजू हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित होता. त्यानंतर रणवीर कपूर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. चार वर्षानंतर समशेरामधून कमबॅक करणार म्हणून चाहते खूप उत्सूक होते. मात्र, कमकूवत कथानक आणि चांगल्या दिग्दर्शनाचा अभाव यामुळे चित्रपटाकडे दर्शकांनी सरळ पाठ फिरवली.
काल शुक्रवारी समशेरा प्रदर्शित झाला. चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळेल असे वाटले होते. मात्र या चित्रपटाला, भूलभूलैय्या आणि पृथ्वीराज चव्हाण पेक्षाही कमी ओपनिंग मिळाले. चित्रपट समीक्षक कोमल नाहाता यांनी म्हटले आहे, आणखी एक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला मात्र कथा तीच आहे. त्यामुळे चित्रपटाला दर्शकांचा प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी सकाळी आणि दुपारचे शो दर्शकांच्या अभावामुळे कँसल करावे लागले.
वाचा चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
10.25 Crore Producer Figure
10 Crore Trade Figure
Trade Expectation: 12- 14 Crore
दरम्यान, चार वर्षानंतर कमबॅक करणा-या रणवीरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळत असते. त्यामुळे यावेळीही त्याने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, चांगली ओपनिंग न मिळाल्याने रणवीरचा देखील अपेक्षा भंग झाला आहे.