नागपूर : खोट्या सह्या करून बँकेतून काढले साडेनऊ लाख रूपये

file photo
file photo
Published on
Updated on

नागपुर : पुढारी वृत्तसेवा : भागीदाराच्या खोट्या सह्या करून संयुक्त खात्यातून बँकेतून साडेनऊ लाख रूपये काढून घेतले. तसेच सोळा व्हाऊचरद्वारे स्वत:च्या खात्यात पावणेतीन लाख रूपये वळते केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झिंगाबाई टाकळी येथे राहाणारे फिर्यादी शिवकुमार रामचंद्र तिवारी (वय ६२) व आरोपी देवयानी नवनीत लांडगे (वय ३८) यांची भागीदारीत श्रीराम लॅण्ड डेव्हलपर्स नावाने फर्म आहे. श्रीराम को.ऑप. बँकेच्या गोधनी शाखेत फर्मचे जाॉइंट अकाऊंट होते. याच बँकेत आरोपी देवयानी लांडगे यांचे पती नवनीत ज्ञानेश्वर लांडगे (वय ४९) हे कॅशीयर म्हणून काम करतात.
आरोपी देवयानी लांडगे व त्यांचे पती नवनीत लांडगे यांनी संगनमत करीत फर्मच्या जाॉइंट अकाऊंटमधून शिवकुमार तिवारी यांच्या खोट्या सह्या करून ३१ धनादेशाद्वारे ९ लाख ४८ हजार रूपये काढले. तसेच त्यांना अंधारात ठेवून १६ व्हाऊचरद्वारे २ लाख ७९ हजार ४२६ रूपये देवयानी लांडगे यांच्या स्वतंत्र खात्यात वळते केले.

फिर्यादी शिवकुमार तिवारी यांची आरोपींनी १२ लाख २७ हजार रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपी गजाआड होतील असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news