यवतमाळ : 'एमबीबीएस'च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या | पुढारी

यवतमाळ : 'एमबीबीएस'च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

नागपूर येथे एमबीबीएस तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने इसापूर धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.पुसद येथील रहिवासी परिक्षित पंजाबराव चंद्रवंशी (२२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता.

काही दिवसांपूर्वीच परिक्षितचा द्वितीय वर्षाचा निकाल लागला. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. सुटी असल्याने काही दिवसांपासून परिक्षित पुसद येथे आपल्या घरी राहत होता.सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास तो घरी काहीही न सांगता दुचाकीने निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

परिक्षितचे शेवटचे मोबाइल लोकेशन इसापूर धरण येथे मिळाले. परिक्षितने अंचुळेश्वर मार्गाने इसापूर धरण गाठले. तेथे दुचाकी एका झुडपात फेकून त्याने धरणात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

हेही वाचा : 

Back to top button