Old Currency : ६२ लाखांच्‍या जुन्‍या नोटा घेतल्‍या १४ लाखांना विकत! जुन्‍या नोटांमधून ‘कमाई’चा धंदा आला अंगलट | पुढारी

Old Currency : ६२ लाखांच्‍या जुन्‍या नोटा घेतल्‍या १४ लाखांना विकत! जुन्‍या नोटांमधून 'कमाई'चा धंदा आला अंगलट

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
जुन्‍या नोटा विकत घेवून त्‍याच्‍या बद्‍दल्‍यात कमाई करण्‍याचा उद्‍योग एकाच्‍या चांगलाचा अंगलट आला आहे. दिल्‍लीतील लक्ष्‍मीनगर परिसरातील रमेश पार्कमधून पोलिसांनी डॉ. एजाज अहमद याला ५०० आणि एक हजार रुपयांच्‍या जुन्‍या नोटांसह अटक केली आहे. डॉ. एजाज अहमद याच्‍याकडून तब्‍बल ६२ लाख रुपयांच्‍या चलनात नसणार्‍या नोटा ( Old Currency ) आढळल्‍या. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, त्‍याने ६२ लाखांच्‍या जुन्‍या नोटा १४ लाख रुपयांना विकत घेतल्‍या होता. या नोटा तो २० लाख रुपयांना विकणार होता, अशी माहिती पोलिसांच्‍या प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

जुना नोटांच्‍या विक्रीची घेतली गुप्‍तचर विभागाने माहिती

दिल्‍लीमधील शकरपूर पोलीस ठाण्‍यातील कर्मचार्‍यांना जुन्‍या नोटाचा व्‍यवहार होणार असल्‍याची माहिती मिळाली. त्‍यांनी डॉ. एजाज अहमद याला ६२ लाखांच्‍या जुन्‍या नोटासह अटक केली. सर्वच प्रकरण संशयास्‍पद असल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यांनी दिल्‍ली पोलिसांच्‍या विशेष पथकासह गुप्‍तचर विभागालाही याची माहिती दिली. आरोपी हा जुन्‍या नोटा कोणत्‍या प्रकारे बाजारात विक्री करत होता, त्‍याच्‍याकडून या नोटांची खरेदी कोण करत होते, याची माहिती पोलिसांच्‍या विशेष पथकासह गुप्‍तचर विभाग घेत आहेत.

जानेवारीत उत्तराखंडमध्‍ये ४ कोटींच्‍या जुन्‍या नोटा केल्‍या होत्‍या जप्‍त

जानेवारी महिन्‍यात उत्तराखंडमध्‍येही असा प्रकार उघडकीस आला होता. उत्तराखंड पोलिसांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्‍या तब्‍बल ४ कोटींच्‍या जुना नोटा जप्‍त केल्‍या होत्‍या. यानंतर आता पुन्‍हा एकदा दिल्‍लीत असाच प्रकार उघडीकस आला आहे. या नोटांची खरेदी आणि विक्री कशी होते, कोणत्‍या कारणास्‍तव चलनातून बाद झालेल्‍या नोटांची खरेदी केली जाते, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button