बनावट जात प्रमाणपत्राच्या कोणीही निवडणूक लढू नये : रामदास आठवले | पुढारी

बनावट जात प्रमाणपत्राच्या कोणीही निवडणूक लढू नये : रामदास आठवले

अमरावती; पुढारी वृतसेवा: बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षित जागेवरून कोणीही निवडणूक लढवू नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ते अमरावती दौऱ्यावर आले असता रामदास आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या परिषदेत ते बोलत होते.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बनावट जाती प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविण्याचे प्रकरण न्यायालयात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर काही बोलता येईल. असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना द्यावी राज्यातील सत्ता

भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्यावी. भाजप – शिवसेनेमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे आठवले म्हणाले. याबाबत संजय राऊत व चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशात ऑक्सिजन सुविधा पुरविली आहे. ऑक्सिजन सुविधेमुळे कोणाचाही जीव जाणार नाही. तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज केली आहे. यावेळी केंद्रीय रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

मराठा आरक्षणाबाबत राज्याने घ्यावा पुढाकार

मराठा आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा असे आठवले म्हणाले. भटक्या जाती- जमाती मधील नागरिकांना आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याचे आठवले म्हणाले. पेट्रोल दरवाढीबाबत नियंत्रण आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रिपाई नेत्यांनी यावेळी एकत्र यावे

रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. कोणासोबत आघाडी केल्यानंतरच रिपाईला सत्तेत येता येईल. रिपाईचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर तसे करणार नसल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचलंत का?

पाहा : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

Back to top button